पौर्णिमा | पौर्णिमेच्या सेवा उपाय महत्व

पौर्णिमा पौर्णिमेच्या सेवा उपाय महत्व

पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो, या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते, दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी ठरली जाते. भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतो, तर या दिवशी भगवान हरींची देखील पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी भगवान हरींचा उपवास केला जातो, रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यात थोडी खडीसाखर आणि तांदूळ टाकायचे आहे.

पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत अंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते, पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपवास तसेच उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते, आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजा करू शकतो, सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते.

पौर्णिमा सेवा उपाय महत्व

पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात, जर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता, तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे.

पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे, मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्रांची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे. याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात.

पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे, ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते, आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते, त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपण करायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते.

पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर सात कापुराच्या वड्या च्या आहेत. आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन त्यातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करावे.

हि पोस्ट नक्की वाचा: घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे 11 उपाय करा

अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला उपाय करू शकता मुळे आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपले सर्व संकट दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर राहील उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता. माता लक्ष्मी ही चंचल असते ते स्थिर राहण्यासाठी हे सर्व उपाय आपण केले पाहिजे.

श्री स्वामी समर्थ…..!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *