देवघरात पाळावयाचे महत्वाचे 21 नियम

देवघरात पाळावयाचे 21 नियम
देवघरात पाळावयाचे 21 नियम

देवघरात पाळावयाचे 21 नियम महत्वाचे आहे ते आपल्याला माहित असणे खूप आवश्यक आहे, आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघरा बाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो, देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना, आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे.

देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे, ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल, म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे, घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहीत राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवघरा बाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत.

देवघरात पाळावयाचे 21 नियम

  1. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा.
  2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धुळ साचता कामा नये.
  3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये.
  4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा.
  5. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे, ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात.
  6. आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे.
  7. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये.
  8. देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात.
  9. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते, ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते.
  10. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा वहायच्या नसतात.
  11. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते.
  12. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो.
  13. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा.
  14. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही.
  15. समय मध्ये तीन वाती लावायच्या नसतात. एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते.
  16. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो.
  17. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच.
  18. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे. आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा.
  19. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत, तामसी पदार्थ देवांना चालत नाही.
  20. मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली, तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये.
  21. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो ,सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते.

अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे 21 नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत, असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते. आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभीत ठेवले पाहिजे.

श्री स्वामी समर्थ……!

हि पोस्ट नक्की वाचा: घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे 11 उपाय करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *