नमस्कार, मी मयुरी आपल्या भक्ति प्रसार ची संस्थापक आहे.
मी एक ऑनलाईन कंटेंट क्रियेटर आहे त्याचबरोबर मी एक गृहिणी देखील आहे मी माझ्या कामातून उरलेल्या वेळात सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करते. ते धार्मिक विषयाशी संबंधित असतात, ते तुम्हाला माझ्या पोस्ट वाचून कळालेच असेल. मी बाकी अजूनही काही सोशल मीडिया अकाउंट वर ऍक्टिव्ह आहे.

त्यात You Tube , Instagram ,Facebook या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर भक्ति प्रसार या नावाने उपलब्ध आहे, मी आपल्या भक्ती प्रसार या वेबसाईटवर धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकते. आपल्या धार्मिक रूढी, परंपरा, चालीरीती, प्रथा, पूजा,अर्चना, सेवा, भक्ती मार्गा विषयी माहिती आपल्याला या वेबसाईटवर वाचायला मिळेल. ही माहिती मी वेगवेगळ्या धार्मिक पुस्तकांचा आणि ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीचा संदर्भ घेऊन त्याचप्रमाणे इतर धार्मिक माध्यमांचा संदर्भ घेऊन एक खात्रीशीर माहिती आपल्या पोस्टद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.

आजच्या युगात आपल्या सर्वांचे जीवन खूप धकाधकीचे झालेले आहे. आपल्या कोणाकडेही इतका वेळ राहत नाही किंवा वेळ असला तरी तो धार्मिक स्वरूपात घालावा असा विचार कोणीच करत नाही. सर्वजण आपल्या दैनंदिन आयुष्यात कामात इतके व्यस्त आहेत की, आपल्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टींसाठी वेळ नसतो. माझा हाच प्रयत्न आहे की आपल्या सर्वांपर्यंत मी आपल्या पोस्टद्वारे धार्मिक स्वरूपाची माहिती तुमच्या सर्वां पर्यंत पोहोचावी. यात माझा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही किंवा प्रयत्नही नाही. योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे.

आपल्या या वेबसाईटवर सर्व ,सण ,उत्सव ,पूजा याविषयी माहिती आपल्याला वाचायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या धार्मिक परंपरा, रुढी ,प्रथा ज्या लोप पावत चालल्या आहे, त्या आपल्या पुढील पिढीस माहिती असाव्या म्हणून भक्ति प्रसार च्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न करत आहे.

आपल्या भक्ति प्रसार या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वर आणि फेसबुक पेजवर फॉलो करा या सर्वांच्या लिंक मी खाली दिलेल्या आहेत. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Email: info@bhaktiprasar.com

श्री स्वामी समर्थ……!