आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणे करून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील, आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात, आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील.
घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम
- आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे, झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे.
- घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते, लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये.
- सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मी कारक आहे.
- संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, घरातून लक्ष्मी (पैसे) बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात, गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये.
- सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला, व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये.
- बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते.
लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय
- रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी, असे केल्याने घरातील नेगीटिव्हिटी दूर होते.
- घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.
- आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे.
- घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नेगीटिव्हिटी (नकारात्मकता) दूर होण्यास मदत होते.
- प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवद्य म्हणून दाखवावी, असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात.
- महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते.
- आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत.
- आपल्या घरातील देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी, श्री यंत्रामध्ये अष्टलक्ष्मी चा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मीआणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही.त्यामुळे आपण आपल्या घरात श्री यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील.
- आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा.
- आपल्या घरातील स्त्री रुपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते, घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते.
- या सर्व उपायान बरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला कारायचा आहे.
महाशिवरात्री विशेष कथा हि पोस्ट नक्की वाचा.
गुरुपुष्यामृत योग काही सेवा आणि उपाय ही पोस्ट नक्की वाचा.
अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मीमातेची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. हा लेख संपूर्ण वाचल्या बद्दल धन्यवाद, श्री स्वामी समर्थ…!