महाशिवरात्री विशेष कथा | Mahashivratri Special Story

Mahashivratri

महाशिवरात्रीच्या दिवशी काय घडले

Mahashivratri च्या दिवशी ब्रम्हांडात काही विशेष महत्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले, त्या महत्वाच्या घटनाच्या कथा या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, शिवाला सर्वात जास्त प्रिय असलेला हा दिवस म्हणजे महाशिवरात्री. तसे पहायला गेले तर वर्षभरात 12 शिवरात्री असतात पण फाल्गुन कृष्ण पक्ष चतु्थीच्या दिवशी येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.

या दिवशी चंद्रदेव शापातून मुक्त झाले, मार्तेंडेय ऋषींनी जगाला महामृत्युंजय मंत्रा दिला, सोमनाथ तिर्थाची स्थापना, महादेव शाप मुक्त झाले, चंद्राला महादेवाने अभयदान दिले, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या तो दिवस म्हणजे महाशिवरात्री, काय आहे या सर्व घटनामागची कथा ते आपण सविस्तर पाहू.

महाशिवरात्री शिवास प्रिय

प्रजापती दक्षला कन्या होत्या, त्यातील दोन कन्या रेवती आणि रोहिणी यांचा विवाह चंद्रा सोबत झाला होता, आणि एक कन्या सती जीचा पुढे जाऊन महादेवाशी विवाह झाला, चंद्र देवाने प्रजापती दक्ष च्या दोन्ही मुलींशी लग्न केले होते पण चंद्र फक्त एकाच पत्नी वर प्रेम करत होता, रेवती ला पत्नीचा दर्जा देत नाही , ही गोष्ट जेव्हा दक्ष ला माहीत झाले, तेंव्हा प्रजापती दक्ष ने चंद्राला या कृत्याची शिक्षा म्हणून शय होण्याचा शाप दिला,चंद्र देवाला शाप देताच चंद्र देव मुरछित होऊन पडले,शापा मुळे चंद्र देवाचे शरीर हळूहळू नश्ट होऊ लागले होते, चंद्राचे जीव वाचवणे फ्कत महादेवाच्या हातात होते, चंद्राला शय होण्याचा शाप दिला हे कळल्यावर शिव अतिशय क्रोधित झाले होते,

महादेवाला शांत फक्त ब्रम्हा आनी विष्णू हेच करू शकत होते, त्यासाठी ब्रम्हादेवाने आणि विष्णूदेवाने महादेवाची पूजा करणे गरजेचे होते, पण दक्षाने महादेवाना पण शाप देऊन पूजेतून बहिष्कृत केले होते, महादेवाला शाप मुक्त करण्यासाठी ब्रम्हादेवाने आणि विष्णूदेवाने सतीची शिवलिंग हातामधे घेऊन पूजन केले त्यामुळे महादेव शाप मुक्त झाले व त्यांचा क्रोध पण शांत झाला, महादेव शाप मुक्त झाले तो दिवस फाल्गुन कृष्ण पक्ष चतु्थी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस होता.

महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला

इकडे नारद मुनींनी सतीला सांगितले की चंद्र देवाला अकाली मृत्यु पासून वाचवायचे असेल तर मार्तेंडेय ऋषीकडून महामृत्युंजय मंत्र घेऊन त्याचे पठन केल्यास चंद्र देवाला अकाली मृत्यु पासून वाचवता येईल,पण मार्तेंडेय ऋषीनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला नव्हता, मार्तेंडेय ऋषीनी त्यांचा अकाली मृत्यु टाळण्यासाठी हा मंत्र त्यांनी तयार केले होता,
महादेवाने त्यांच्या तपचर्या वर प्रसन्न होऊन त्यांच्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हणुन मान्यता दिली होती,
व वरदान दिले होते की जो भक्त महामृत्युंजय मंत्रा चे नियमीत पठण करेल त्याचे अकली मृत्यु पासून रक्षण होईल, महामृत्युंजय मंत्राला मान्यता मिळाली होती तो दिवस पण महाशिरात्री चा होता, सतीने मर्तेंडेय ऋषीकडे महामृत्युंजय मंत्र मागितला असता चंद्र देवाचे प्राण वाचविण्यासाठी मार्तेंडेय ऋषीनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला, तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस होता.

Mahashivratri

महामृत्युंजय मंत्राच्या प्रभावाने चंद्राचा अकाली मृत्यू टळला, महादेवाने चंद्र देवाला दर्शन देवून चंद्राला त्याच्या कृत्या बद्दल समज दिली, आणि चंद्राची चूक ही शमे योग्य नाही त्याला शिक्षा ही भोगावी लागेल दक्षाचा शाप संपूर्ण नश्ट न करता त्याच्या शापाची तीव्रता कमी होण्यासाठी महादेवाचे चंद्राचा आपल्या मस्तकावर धारण केले, चंद्राचा शाप ही सृष्टी असे पर्यंत तसच राहणार, दर महिन्याच्या पंधरा दिवस चंद्र शय होत जाणार, आणि पुन्हा पंधरा दिवसात पूर्णत्वास येणार असे महादेवाने सागितले. अमावस्या व पौर्णिमा हा चंद्र देवाला दिलेला शाप अजुनही आहे.
चंद्राचा जीव वाचला व महादेवाने त्याला आपल्या मस्तकावर धारण केले तो दिवस पण महाशिवरात्रीचा होता , ज्या ठिकाणी चंद्र देवाला जीवदान मिळाले त्या स्थळी सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली, तो दिवस महाशिरात्री चा होता, सोमनाथ तिर्थाच्या दर्शनाने सर्व बाधा व दोषांचे निवारण होते.

गुरुपुष्यामृत योग काही सेवा आणि उपाय ही पोस्ट नक्की वाचा

महाशिवरात्रीला काही विशेष आशीर्वाद

महादेवाने महाशिवरात्रीला काही विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत, महाशिवरात्रीचे व्रत जे पुरुष करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, ज्या लग्नझालेल्या स्रीया हे व्रत करतील त्यांचे सौभाग्य अबाधित राहील, ज्या कान्याचा विवाह झाला नाही त्यांना या व्रताचे मनाजोगा पती मिळेल,

अशे अनेक आशीर्वाद महाशिवरात्रीला महादेवाने दिले आहे, महाशिरात्री चे व्रत करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा महादेव पूर्ण करतात, महाशिवरात्रीच्या या विशेष कथेस नक्की लाईक करा व ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *