गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय ?
आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहितीच नाही हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहित नाही, आज आपण आपल्या या ब्लॉगमध्ये गुरुपुष्यामृत योगा विषयी माहिती पाहणार आहोत.
पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरुपुष्यामृत योग म्हणतात, गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो, हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो, गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखी काही महत्त्वाची कामे करू शकता नवीन व्यवसायही सुरू करू शकता.
गुरुपुष्यामृत या दिवशी करायचे काही उपाय
गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत, या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या गुरुना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो. या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे .आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे, तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते.
हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचे आहे, त्यावर अक्षदा वहावयच्या आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची, आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे, किचन मधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे, तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे, किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे, देवघराची साफसफाई करायची आणि देवांची पूजा करायची आहे, घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे.
गुरुपुष्यामृत या दिवशी करावयाच्या सेवा
गुरुपुष्यामृत या दिवशी काय सेवा करायच्या त्या पाहुयात, आपल्या देवघरातील श्री यंत्रावर कुंकुमार्चन करावे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकूमार्चन करावे त्यानंतर ते नाणे तिजोरी ठेवायचे आहे, जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो, रोज आपण जेथे पैसे ठेवतो, तेथे ते नाणे ठेवावे, हे कुंकूमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे, असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरूंची सेवा करायची आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा माळी जप करायचा आहे, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे, त्यानंतर आपल्या कुलदैवतेची सेवा करायची ओम कुलदेवताय नमः असा जप करायचा आहे, असा जप करत एक जपमाळ करायची आहे.
महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे. कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाहीतर युट्युब वर उपलब्ध आहे, हे ऐकू शकता आणि म्हणूही शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे, त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायचीआहे विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र सर्व मंत्रांची देखील एक जपमाळ करायची आहे.
जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक एक मंत्र म्हणायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचे आहे, त्यामध्ये शंखनाद करायचा आहे, आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील, या सर्व सेवा करताना प्रसन्न ठेवा, आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा.
अशा छोट्या छोट्या उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात, या गुरुवारी म्हणजेच 25 मे 2023 ला गुरुपुष्यामृत योग आहे, तर या दिवशी नक्की या सर्व सेवा आणि उपाय करा चांगले अनुभव येतील, गुरु पुष्यामृत योग गुरुवारी सूर्योदयापासून ते सायंकाळी पाच वाजून 53 मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही दिवसभरात या सर्व सेवा करू शकता. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा.
महाशिवरात्री विशेष कथा हि पोस्ट नक्की वाचा
2023 मधील गुरुपुष्यामृत योग
- 30.03.2023 रात्री 10.59 नंतर
- 25.05.2023 सूर्योदया पासून ते संद्याकाळी 5.53 पर्यन्त
- 28.12.2023 उ.रात्री 1.05 नंतर ते सूर्योदयापर्यन्त
या विषयावर तुम्ही यू ट्यूब ला व्हिडिओ देखील पाहू शकता, bhakti prasar या युट्युब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ….!