वटपौर्णिमा 2023 पूजेचा मुहूर्त | वटपौर्णिमेची पूजा कशी करावी ?

वटपौर्णिमा 2023 Vatpurnima
वटपौर्णिमा 2023 Vatpurnima

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जी पौर्णिमा असते तिला वटपोर्णिमा (Vat Pornima) किंवा वटसावित्री म्हणतात. माता सावित्री ने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यम राजाला आपल्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले व आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले, ज्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण परत मिळाले तेथे वटवृक्षाचे झाड होते, त्यावेळी माता सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा केली होती, त्या प्रसंगाची आठवण कायम ठेवून आपल्या प्रपंचात सुख लाभावे व आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतात.

वड देवतुल्य असे झाड आहे, वडाचे झाड हे अतिशय बहुगुणी उपयोगी औषधी वनस्पती झाड आहे, वटपौर्णिमा हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पतिव्रता स्त्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण सावित्रीने दाखवून दिले आहे. जी आपल्या पतीच्या प्रानांसाठी यम राजा सोबत लढली. वटपौर्णिमेला वटसावित्री असे देखील म्हटले जाते, या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून पूजा करतात, तसेच या दिवशी स्त्रिया उपवासही करतात. काही ठिकाणी पूजा करून आल्यानंतरही उपवास सोडतात किंवा संध्याकाळी उपवास सोडला जातो .

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी ?

पूजेसाठी लागणारे साहित्य

एक मोठे ताट घ्यायचे आहे त्यात विड्याची पाने, फुले, दोरा, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, सुपारी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, दोन हिरव्या बांगड्या, पैसे, असे सर्व साहित्य घ्यायचे आहे. आणि त्यासोबतच पाणी भरून गडवा देखील घ्यायचा आहे दिवा अगरबत्ती धूप हे देखील घ्यायचे यातील काही साहित्य उपलब्ध नसेल तर आता बाजारात पूजेसाठी साहित्याचे पॅकेट भेटतात ते देखील आणले तरी चालते अशाप्रकारे सर्व साहित्य जमा करायचे आहे.

वटपौर्णिमा पूजा कशी करायची आहे ते पाहूया..

सर्वप्रथम आपण वडाच्या झाडाला पाणी वाहायचे आहे मग आपण नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर विड्याची जोड पाने मांडून सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची आहे मग त्यांची हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची देखील पूजा करायची आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला हळद-कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे झाडासमोर दिवा अगरबत्ती लावायची वडाच्या झाडासमोर आंबे पैसे ठेवून नमस्कार करायचा आहे.

सर्व पूजेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा गुंतवून सात फेऱ्या मारायच्या आहेत व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आंब्यांनी आणि गव्हाणे सात किंवा पाच सुवासिनींच्या ओट्या भरायच्या आहेत आणि त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्यायचे आहेत.

ही पण पोस्ट देखील तुम्ही वाचा: देवघरात पाळावयाचे महत्वाचे 21 नियम

वटपौर्णिमा 2023 पूजेचा मुहूर्त

या वर्षी वटपौर्णिमा ही शनिवारी 3 जून 2023 रोजी आहे पूजेचा मुहूर्त 3 जून शनिवारी सकाळी 11:17 मिनिटांपासून ते 4 जून रविवारी सकाळी 9:11 मिनिटांपर्यंत आहे. पण आपण शनिवारी पूजा करायची आहे कारण पोर्णिमा तिथीच्या सुरुवातीलाच पूजा करणे शुभ मानले जाते म्हणून आपण शनिवारी सकाळीच पूजा करायची आहे.

श्री स्वामी समर्थ……!